Premium|StorySign app for deaf children : कर्णबधिर मुलांसाठी 'स्टोरीसाइन' ठरतेय वरदान; स्मार्टफोनच्या एका क्लिकवर आता पुस्तके बोलणार सांकेतिक भाषेत

Inclusive education technology : कर्णबधिर मुलांच्या शिक्षणात 'स्टोरीसाइन' ॲप क्रांती घडवत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑगमेंटेड रिॲलिटीच्या मदतीने हे ॲप छापील शब्दांचे रूपांतर सांकेतिक भाषेत करते. यामुळे पालक आणि मुलांमधील संवादाची दरी मिटून साक्षरतेचा नवा मार्ग सुलभ होत आहे.
StorySign app for deaf children

StorySign app for deaf children

esakal

Updated on

ब्रिजेश सिंह - brijeshbsingh@gmail.com

सुलभता ही केवळ सोय नसून तो शिक्षणाचा पाया असला पाहिजे. ‘स्टोरीसाइन’सारख्या पुढाकारातून ही भूमिका स्पष्टपणे समोर येते. काळजीपूर्वक राबवलेली एक साधी कल्पना कशी शांत पानाला अर्थपूर्ण संवादात बदलू शकते हे यातून दिसते. तंत्रज्ञानाचा खरा मापदंड हा त्यात किती फीचर्स आहेत यापेक्षा ते किती आयुष्यांचे बंद दरवाजे उघडते, हा असायला हवा.

प्रत्येक मुलाच्या लहानपणी एक शांत; पण अत्यंत मौल्यवान असा क्षण येतो ज्याकडे आपण सहसा दुर्लक्ष करतो. तो क्षण म्हणजे, पालकांनी एखादे छानसे चित्रपुस्तक मुलासमोर उघडावे, एका विशिष्ट शब्दावर बोट ठेवावे आणि त्या काळ्या-पांढऱ्या आकृत्यांचे अचानक अर्थपूर्ण शब्दांत रूपांतर होताना मुलाच्या डोळ्यांत येणारा तो तेजस्वी प्रकाश पाहावा. ऐकू येणाऱ्या कुटुंबांमध्ये ही वैचारिक आणि भावनिक देवाणघेवाण अतिशय नैसर्गिकपणे घडते; पण जे मूल जन्मतः कर्णबधिर किंवा कमी ऐकू येणारे असते, त्याच्यासाठी लिहिलेल्या अक्षरांचा आणि त्यांचा अर्थ समजण्याच्या प्रवासाचा दुवा सुरुवातीपासूनच काहीसा तुटका राहतो. बहुतांश कर्णबधिर मुले ही ऐकू येणाऱ्या पालकांच्या पोटी जन्माला येतात आणि या पालकांना अनेकदा सांकेतिक भाषा मुळीच अवगत नसते. त्यामुळे छापील शब्द आणि मुलाची मूळ संवाद पद्धत यांच्यातील दरी केवळ शैक्षणिक अडथळा न ठरता, ती एक आयुष्यभराची भिंत बनू शकते. हा गंभीर तुटलेला दुवा लक्षात घेतल्यावरच सहाय्यक तंत्रज्ञानाच्या जगात एक शांत; पण अर्थपूर्ण बदल दिसू लागला आहे आणि तो एक अतिशय सोपा; पण मूलभूत प्रश्न विचारतो, की जर स्मार्टफोन एखादा मजकूर मोठ्याने वाचू शकतो; पण आवाजात नाही तर सांकेतिक भाषेत का नाही?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com