

Modern Akbar Birbal Story
esakal
हिवाळ्याचे दिवस होते. सम्राट अकबरांना त्यांच्या लिमोझीन गाडीतून बाहेर चक्कर मारून येण्याची हुक्की आली. बिरबलाला बरोबर घेऊन जाण्यासाठी त्याला बोलावणे पाठवले. बिरबल महाराजांकडे आला तेव्हा संध्याकाळ झालेली होती. आता लिमोझीनमधून बाहेर जाण्यात काहीच अर्थ राहिला नव्हता. हल्ली वाहतुकीचा खोळंबा ही केवढी मोठी अडचण झालेली होती.
बिरबल हुशारीने म्हणाला, ‘‘महाराज, कित्येक दिवसांत आपण पायी कुठेच फेरफटका मारलेला नाही. पायी फिरण्याचे खूपच फायदे आहेत. वाढलेले वजन कमी करण्यासाठी, मधुमेह कमी करण्यासाठी डॉक्टर पायी फिरायला सांगतात. सोशल मीडियावर त्यांचे तसे व्हिडिओज, रील्स फिरत आहेत. आपण आपल्या शाही बागेत पायी फिरायला जाऊया का?’’