Premium|Thyroid in Marathi : हल्ली सगळ्यांना थायरॉइड का होतंय? मीठ कमी जास्त खाण्याचा थायरॉइडशी काही संबंध आहे का?

why thyroid happens ?: मीठातील आयोडिन, प्लास्टिक-जंक फूड, ताणतणाव आणि व्हिटॅमिन D ची कमतरता यामुळे हार्मोन्सचे संतुलन कसे बिघडते याचा सखोल वेध घेणारा लेख..
why everyone have thyroid?

why everyone have thyroid?

Esakal

Updated on

पुणे – मला थायरॉइड आहे ना, त्यामुळे माझं वजन वाढतंय, मला थायरॉइडची गोळी सुरू आहे ना त्यामुळे वजन कमी झालंय... असं आजूबाजूला खूप सहजपणे ऐकतो आपण. एका संशोधनात भारतात ४ कोटी २० लाख थायरॉइडचे रूग्ण असू शकतात असं म्हणलं आहे. हे संशोधनही १० वर्षापुर्वीचं आहे. त्यानंतर भारतातल्या थायरॉइडच्या आकडेवारीची फारशी माहिती किंवा अभ्यास प्रसिद्ध झालेले दिसत नाहीत.

२५ मे २०२६ रोजी जागतिक थायरॉइड डे पाळण्यात येतो. २०१० मध्ये European Thyroid Association च्या पुढाकारातून या दिनाची सुरूवात केली होती. हा दिवस ठरविण्यामागचं कारण वाढत चाललेल्या थायरॉइडच्या आजाराविषयी जनजागृती निर्माण करणे.

शरिरात थायरॉइड कमी जास्त झाल्याने तुमच्या चयापयावर, वजनावर परिणाम होतो. तसेच थकवा, केसगळती, पाळीतील अनियमिता, मूल होण्याचा संबंध या सगळ्याशी याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध येतो.

पण हे थायरॉइड नेमकं आहे काय? पुर्वीच्या काळी असा काही आजार असल्याचं ऐकलं नाही मग आताच हा आजार का वाढलाय, या आजाराचा मीठ खाण्याशी काही संबंध आहे का, याविषयीची संशोधनं काय सांगतात, हा पुर्णपणे बरा होतो का, याचं गंभीर स्वरूप काय असू शकतं आणि थायरॉइड होऊच नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी.. हे सगळं आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com