Premium|Apple Inc Leadership Change 2026 : निरोप 'ऑपरेशन गाय'चा! ॲपलमध्ये १५ वर्षांनंतर मोठे फेरबदल; टीम कूक यांच्यानंतर कोणाकडे धुरा?

Future of Apple After Tim Cook : स्टीव्ह जॉब्ज यांच्यानंतर ॲपलला जागतिक शिखरावर नेणारे 'ऑपरेशन गाय' टीम कूक १ सप्टेंबर २०२६ रोजी पायउतार होत असून, त्यांच्या शिस्तबद्ध आणि प्रक्रियाप्रधान नेतृत्वाखालील दीड दशकाचा हा रंजक प्रवास तंत्रज्ञान विश्वासाठी एक मार्गदर्शक धडा ठरला आहे.
Apple Inc Leadership Change 2026

Apple Inc Leadership Change 2026

esakal

Updated on

डाॅ. मालिनी नायर - nairmalini2013@gmail.com

तंत्रज्ञान क्षेत्रात निर्विवाद वर्चस्व राखणारी ‘ॲपल इन्क.’ कंपनी १ सप्टेंबर २०२६ पासून नवीन नेतृत्वाखाली वाटचाल सुरू करणार आहे. ‘ऑपरेशन गाय’ अशी ओळख असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांच्या समृद्ध नेतृत्वाचा प्रवास १५ वर्षांनंतर थांबणार आहे. त्यांच्या नेतृत्वाचा हा कालखंड सहजसाेपा नव्‍हता; तर प्रचंड आव्‍हानांनी भरलेला हाेता. दीड दशकात कूक यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने साध्य केलेला प्रगतीचा चढता आलेख अत्यंत रंजक आहे. त्यांच्यानंतर ‘ॲपल’ सातत्यावर भर देणार की नवकल्पनांनी नवी भरारी घेणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

टीम कूक यांनी ऑगस्ट २०११मध्ये ॲपलचे नेतृत्व स्वीकारले. हा केवळ नेतृत्वबदल नव्‍हता. कंपनीच्या अस्तित्वाबाबत अनिश्‍चिततेचा ताे काळ हाेता. स्टीव्‍ह जाॅब्स यांनी नवकल्पना प्रत्यक्षात आणून दहा वर्षांत नेतृत्व वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले हाेते. त्यांच्या नेतृत्वाखालील कंपनीची धाेरणे दंतकथा बनून राहिली. एवढा त्यांचा प्रभाव हाेता. हे केवळ यश नव्‍हते; तर उद्याेगाला वारंवार नवी दिशा देण्याची क्षमता सिद्ध करणारा हा कालखंड ठरला. नेतृत्वाची नव्‍याने धुरा हाती घेणाऱ्या कूक यांच्या नेतृत्वात कंपनी नफ्यात राहील की नाही, याची चिंता नव्‍हतीच. उलट ॲपल ही ॲपलच राहील का, हा खरा प्रश्न हाेता. कूक यांना उत्पादन विकसित करण्याची काेणतीच पार्श्वभूमी नव्‍हती. आयबीएम आणि काॅम्पॅकमधून आलेले कूक हे परिचालन विभागात पारंगत हाेते आणि तेच त्यांचे बलस्थान हाेते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com