To Prove Yourself in Relationships: तो किंवा ती आयुष्यात आल्यापासून जे निर्णय तुम्ही आधी खूप बिनधास्तपणे घेत होता अचानक आता ते घेताना तुम्ही त्याच्या किंवा तिच्या दृष्टीकोनातून किंवा समोरच्याचा विचार करून घेताय का..?
तुम्ही सहज वागण्याबोलण्या ऐवजी नकळत नाटकी किंवा कोणाला काहीतरी दाखवू पहाणारं वागताय का.. की अशा टप्प्यावर आला आहात जिथे तुम्ही कळत नकळतपणे समोरच्याच्या नजरेतून स्वत:कडे पाहू लागलाय.?
का..?
आरती म्हणाली माझ्या बॉयफ्रेंडबाबत असं व्हायचं.. मला कॉफी आवडत होती आणि त्याला चहा पण हळूहळू तोही रोज माझ्यासोबत कॉफीच पिऊ लागला. मला माहिती होतं की त्याला जुनी गाणी ऐकायला तितकीशी आवडत नाही तरी तो कित्येक वेळा कारमधून कुठेतरी जाताना ती गाणी लावत असे.
नेहाला तिचा नवरा एखाद्या गोष्टीला चांगला म्हणाला तरच तिला ती गोष्ट खरेदी करायची इच्छा होते. तो नाही म्हणाला तर ती वस्तू घेतच नाही. तर शार्दुल म्हणाला मी कितीतरी वेळा ही गोष्ट नोटीस केली की, एखाद्या ठाराविक व्यक्तीविषयी केवळ मी चांगलं बोलतो आहे म्हणून माझी मैत्रिण देखील त्या व्यक्तीशी चांगली वागते. तिला त्या व्यक्तीला जाणून घेण्यात काडीचाही रस नसतो पण मी त्या व्यक्तीशी तासनतास बोलत बसतो आणि तीही तिला हा विषय किती चांगल्या पद्धतीने समजतो आहे, तिला या विषयात किती रस आहे हे दाखवत राहते. मी जर या व्यक्ती विषयी नकारात्मक बोलले तर कदाचित शार्दुलला मी आवडेनाशी होईल किंवा त्याचं माझ्याविषयीचं मत बदलेल असं तिला वाटतं असतं...
आपलं खरं मत मांडायला घाबरणं, एखाद्या गोष्टीविषयी माझं मत काय आहे हा विचार येण्याआधी त्याचा विचार काय आहे आणि त्याला किंवा तिला काय वाटेल याचा विचार करणं, नकळत स्वत:ची ओळख विसरणं.. असं तुमच्याही बाबतीत होतं का?
मग समोरच्याला जिंकायच्या आणि स्वत:ला सिद्ध करण्याच्या नादात स्वत:लाच हरवून बसतो.. असं का होत असावं... खासकरून प्रेमाच्या नात्यांमध्ये अशा भावना का निर्माण होतात.. असं होण्यामागे मानसिकता काय असते आणि असे होऊ न देता स्वत:चं स्वपण पण राहिल आणि नातंही चांगल्या पातळीवर पुढे जाईल हे 'सकाळ प्लस' च्या लेखाच्या माध्यामातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया...