
सोनिया उपासनी
ब्लॉक प्रिंट्स असलेल्या साड्या, घागरे, स्कर्ट्स, टॉप्स, जॅकेट्स, वन पीस ड्रेसेस, बेडशीट्स, पडदे, फोल्डर्स आणि अनेक दैनंदिन वापराच्या वस्तू सध्या खूप प्रसिद्ध आहेत. ह्या ब्लॉक प्रिंट्सना कुठल्या फॅशन ट्रेंडची गरज नाही, या प्रिंट्स स्वतःच एक एव्हरग्रीन ट्रेंड आहेत.
फॅशनच्या चंदेरी दुनियेतून कधीच लुप्त न झालेली फॅशन म्हणजे ब्लॉक प्रिंट्स. ब्लॉक प्रिंटिंग केलेले कपडे आजही ट्रेंडमध्ये आहेत. ब्लॉक प्रिंटिंग फार पूर्वीपासून आशियाई देशांमध्ये ट्रेंडमध्ये आहे. त्यासाठीचे रंग पूर्वी निसर्गातूनच मिळवले जात होते.