
पृथा वीर
अलीकडे प्रेझेंटेबल असणे खूप महत्त्वाचे झाले आहे. म्हणूनच कामाचे ठिकाण असो किंवा घर, रोज वापरायच्या अर्थात ‘डेली युज’ ज्वेलरीबाबतीत स्त्रिया कमालीच्या चुझी झाल्या आहेत. अगदी तसेच स्वतःचे विचार अभिव्यक्त करणारी स्टाइल आणि दागिने यांना हल्ली पसंती मिळते आहे. हातातील साधे घड्याळसुद्धा स्टाइल स्टेटमेंट म्हणून ओळखले जाते. म्हणूनच गेली काही वर्षे डेली युज ज्वेलरी ही स्टेटमेंट ज्वेलरी म्हणूनही लोकप्रिय होत आहे.