
विवेक पंडित
pvivek2308@gmail.com
माझ्याकडून उत्स्फूर्त घोषणा आली, ‘आदिवासी ढोर नाय, मानूस हाय’, ‘मानुसकीची भीक नको, हक्क हवा, हक्क हवा’... नंतर ही घोषणाच संघटनेची ओळख बनली. इतकंच नव्हे; तर ही घोषणा अनेक भाषांमध्ये भाषांतरीत होऊन देशभरातल्या अनेक संघटनांमध्ये आजही म्हटली जाते आहे. ही घोषणा तयार होताच एक वेगळं बळ, वेगळंच सामर्थ्य संचारलं.