संदीप खरे - saptrang@esakal.comमना, मनस्वीपणा कशाला असा करावा? स्वतःस आणि दुसऱ्यालाही जो डाचावा? दैवे दिधले सद्गुण-त्यांचा पाऊस व्हावा आनंदे घे वेचुन; त्याचा भार नसावा! जरी तुझी वा परक्याचीही छळु दे तुजला .सुखदुःखे ही तुझीच अंती कळू दे तुजला!हर्ष-व्यथांचे उगाच हे अवडंबर कसलेतू न एकटा ज्याने हे आकांत सोसले!लाखो येथे मुक! एक तू बोलू शकतो;मान्य! परंतु हक्क कशाने तुज हा मिळतोउगा कलंदर वागावे... सकला झुकवावे...तुझ्या क्षुधा-तृष्णांना कोणी का पोसावे?अव्यक्ताच्या ओझ्याखाली उसासणारेकणभर करशी त्याला जे मणभर म्हणणारे -.Premium|Petopia: सकाळ पेटोपिया; पाळीव प्राण्यांसोबतच्या नात्यांचा उत्सव.कृतज्ञता ठेवून जराशी त्यांच्यासाठीपुढे जा जरा - नीरवतेच्या तीराकाठी !उरात माझ्या वादळ वादळ... बोंब कशाला?मी हळवा, मी हळवा... भुक्कड घोष कशाला?हळवेपण येतेच कृतितुन - शब्दावाचुनखरेच हळवे ते पोलादी बनती आतुन!नियमितता ही पुण्य नसे; पण पाप नव्हे रेशांतपणाने जगणे म्हणजे शाप नव्हे रे!.बघ ना आभाळातील तो सर्वोच्च कलंदरमुकेपणाने नियमित करतो जंतर-मंतर!कणाकणातुन माती जेव्हा तहानते बघव्योम काजळी-निळे विजेने शहारते बघ!या स्थळ-काळा-जळ-तृष्णेचा सोस नसावाअघटित घडते तेही जेव्हा घडणे तेव्हा!.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.