
डॉ. मिलिंद वाटवे
अलीकडच्या काळात संशोधनामागचं ध्येयच बदलून गेलं आहे. मला कुठला प्रश्न पडला आहे, कशाबद्दल कुतूहल निर्माण झालं आहे, समाजाच्या कुठल्या समस्या आहेत, हे महत्त्वाचं नसून यावर निबंध प्रसिद्ध होईल का, याला निधी मिळेल का, यावर संशोधनाचा विषय ठरतो. या स्थितीत लोकवैज्ञानिकांच्या कामाचे महत्त्व अधोरेखित होते.
संशोधन कोण करू शकतो, याचं सर्वात सोपं आणि सरळ उत्तर आहे कुणीही. त्यासाठी पदवी, पीएचडी इत्यादीची मुळीच आवश्यकता नाही. डार्विनकडे कुठे विज्ञानातली पदवी होती? शाळा सोडून दिलेलं पोर ते.