Trump’s Economic Strategyesakal
प्रीमियम आर्टिकल
Premium| Trump's Trade War: धोरणात्मक अस्थिरतेची रणनीती
Economic Gamble: अमेरिकेवर कर्जाचा डोंगर, त्यावर उपाय म्हणजे गुंतवणुकीतील अस्थिरता. ट्रम्पच्या खेळीमागे मोठा डाव.
डॉ. योगेश कुलकर्णी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मनमानी पद्धतीने, काहीशा असंबद्धतेने वागताना भासत असले तरी ते वास्तवात तसे नसण्याची दाट शक्यता आहे. “टॅरिफमध्ये सवलत हवी, तर व्यापार, तंत्रज्ञान किंवा राजकीय धोरणात आमच्याशी सहकार्य करा,”असा हा सौदा आहे. यामधूनच निर्माण होणार आहे जागतिक मांडणीचा फेरआराखडा.
अ मेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडून येताच नवनवीन धोरणांची घोषणा करण्याचा सपाटा लावला. त्यांनी नव्या आयातशुल्कांची घोषणा करताच, अमेरिकेतील आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये खळबळ उडाली. भरीसभर म्हणजे दरदिवशी काहीतरी नवीन घोषणा. एके दिवशी सर्वांना १० टक्के, नंतर एके दिवशी, कोणत्यातरी अजब सूत्रानुसार कोणाला २०, २६, ३७, ५० टक्के इत्यादी.. यावर महागाई वाढेल, व्यापारयुद्ध पेटेल अशी ओरड झाली.