Premium|Trump Russia Diesel Deal : ट्रम्प यांची रशियाबाबतची भूमिका बदलली; डिझेल करारामुळे युक्रेनच्या अडचणी वाढणार?

US Russia Relations : डोनाल्ड ट्रम्प यांच्या रशियाविषयक बदलत्या भूमिकेमुळे अमेरिका-रशिया संबंध, युक्रेन युद्ध आणि झेलेन्स्की यांच्या नेतृत्वावर प्रश्न निर्माण झाले आहेत. ऊर्जा दर आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांचाही या धोरणावर परिणाम होऊ शकतो.
Trump Russia Diesel Deal

Trump Russia Diesel Deal

esakal

Updated on: 

अचानक ट्रम्प यांनी रशियातून डिझेल खरेदीवर निर्बंध हटवण्याचा पवित्रा घेतल्याने रशियाला युद्धबंदीसाठी भाग पाडण्याच्या अमेरिकेच्याप्रयत्नांवरच प्रश्नचिन्ह तयार झालं. युक्रेनसह युरोपातील देश या बदलत्या भूमिकेला विरोध करत आहेत. मात्र ट्रम्प त्याची फिकीर करतील ही शक्यता नाही. त्यावर कडी करणारा बाॅम्ब त्यांनी टाकला तो म्हणजे युक्रेननं नवा नेता निवडावा, असं सागून टाकलं. हेच पुतीनही युद्ध सुरू झाल्यापासून सांगत आले आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लहरी निर्णयप्रक्रियेविषयी आता नव्यानं काही सांगावं असं काही नाही. मात्र त्यांनी नुकताच रशियाकडून डिझेल खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय जगाच्या भुवया उंचावणारा होता. खरंतर अमेरिकेनं नेहमीच आपल्या सोयीनं जागतिक राजकारणात भूमिका घेतलेल्या आहेत, मात्र त्यातही एक सूत्र राहिले. ट्रम्प यांच्याबाबतीत नेमका कसलाच अदाज बांधता येणार नाही, अशी कार्यपद्धती हेच वैशिष्ट्य बनलं आहे. एका बाजूला अमेरिकी काॅंग्रेसनं रशियाकडून तेल घेणाऱ्या देशांवर १०० टक्के पर्यंत अतिरिक्त आयात शुल्क लावण्याचा कायदा मंजूर केला, त्यानुसार ट्रम्प यांना रशियाची कोंडी करण्यासाठी आयात शुल्काचा वापर करण्याचे अधिकार मिळाले. आता हे अधिकार ते चीन आणि भारताविरोधात वापरतील काय, अशी चर्चा सुरू असताना त्यांनीच रशियाकडून डिझेल खरेदीला मान्यता द्यावी हे अक्रीत घडलं. रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेन दीर्घकाळ रशियाचा प्रतिकार करतो आहे, त्यामागे अमेरिकेचं सामर्थ्य आहे. रशियाशी थेट युद्धात न गुंतता रशियाचा शक्तिपात करण्याचं धोरण बायडेन यांच्या प्रशासनानं अवलंबलं, त्याला ट्रम्प क्रमानं तिलांजली देताहेत. रशियासोबत युद्ध सुरू ठेवण्यासाठी युक्रेन बव्हंशी अमेरिकेवर अवलंबून आहे. त्याचाच परिणाम म्हणून ट्रम्प युक्रेन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की यांना सातत्यानं अपमानास्पद वागणूक देत आले. आता तर त्यांनी युद्ध थांबवण्यासाठी तडजोड करण्यास युक्रेनने नेते बदलावा म्हणजे झेलेन्स्की यांना हटवावं असं सांगायला सुरुवात केली. हे दुसऱ्या देशांच्या अंतर्गत बाबीत उघड हस्तक्षेप करणारं आहे. मात्र कोणत्याच नियम कायद्यांची पत्रास न बाळगणारे ट्रम्प असले राजनयाचे संकेत पाळतील, ही शक्यता नाही. ट्रम्प यांच्यासाठी अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका जिंकणं, किमान मोठा पराभव टाळणं हेच तातडीचं उद्दिष्ट आहे आणि अमेरिकेतील डिझेलच्या वाढत्या किमती निवडणुकीवर परिणाम घडवू शकतात. एवढ्यासाठीच त्यांनी अमेरिकेच्या दीर्घकालीन धोरणाला सोडचिठ्ठी देणारा निर्णय घेतल्याचं दिसतं. यातून झेलेन्स्की यांना ट्रम्प यांच्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, यांची बोचरी जाणीव झाली असेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com