

Trump removes Nicolas Maduro
eSakal
व्हेनेझुएलाचे पदच्युत अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावर अमेरिकेने अमली पदार्थांच्या तस्करीचा ठपका ठेवला असला, तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत विध्वंसक असा पायंडा पाडला आहे. आता रशिया आणि चीनदेखील त्यांना धोकादायक ठरू पाहणाऱ्या शेजारील देशांविरुद्ध आपल्या कृत्याच्या वैधतेची पर्वा न करता अशाच पद्धतीने लष्करी कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
का सार्वभौम देशाच्या विद्यमान अध्यक्षाचे अपहरण करून डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला चकित केले आहे. अर्थात व्हेनेझुएलामधील त्यांच्या हस्तक्षेपाची तयारी आधीच सुरू झाली असली तरीही ज्या वेगाने कारवाई झाली आणि ज्या मर्यादांचे त्यांनी उल्लंघन केले, ते खरेच आश्चर्यकारक आहे. व्हेनेझुएलाचे आताचे पदच्युत अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी जुलै २०२४ आणि त्या आधीच्या २०१९च्या निवडणुकांमध्ये गैरप्रकार करून सत्ता राखल्याचे सांगितले जाते. व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना पकडून आणि त्यांना पदच्युत करण्याच्या अमेरिकेच्या कारवाईबाबत आंतरराष्ट्रीय समुदायानेदेखील गंभीर चिंता व्यक्त केली आहे. अशा घडामोडींमुळे अत्यंत घातक असा पायंडा पडल्याची प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रसंघाचे अध्यक्ष अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन डुजारिक यांनी व्यक्त केली आहेच.