
भावेश ब्राह्मणकर
पॅरिस करारातून अमेरिका बाहेर पडत असल्याच्या प्रस्तावावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. त्याचे काय परिणाम होतील? हवामान बदलाच्या लढ्याचे काय होईल? अन्य विकसित देश काय करतील? येत्या दोन-अडीच दशकातच पृथ्वीवरील मानवी जीवन संकटाच्या खाईत जाईल का? अमेरिका या संकटांपासून स्वतःला दूर ठेवू शकेल का?
लॉस एंजेलिसच्या जंगलात लागलेल्या महाकाय वणव्याने पाहता पाहता हाहाकार माजवला. तीन हजारांहून अधिक एकरांवर हे अग्नितांडव सुरू होते. सत्तर हजारांहून अधिक लोक बेघर झाले. अमूल्य जैविक संपदा खाक झाली. १५० अब्ज डॉलरपेक्षा अधिक नुकसान झाले. हेलिकॉप्टर, विमानांच्या शेकडो फेऱ्यानंतरही आगीवर नियंत्रण मिळत नव्हते. कारण, वाऱ्याचा सुसाट वेग.