मुंबई : तुम्हाला अमेरिका देशाचे कायमस्वरूपी नागरिकत्व हवे आहे तर तुमच्याकडे भरपूर पैसा गरजेचा आहे. कारण अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर त्यांनी धडाधड निर्णय घेण्याचा धडाकाच लावला आहे. नुकतीच त्यांनी एक घोषणा केली असून त्यानुसार परदेशी नागरिकांना जर अमेरिकेचे ग्रीन कार्ड होल्डर म्हणजेच या देशाचे कायमस्वरूपी नागरिक व्हायचे असेल तर त्या व्यक्तीला ५ मिलियन डॉलर म्हणजेच ४१ कोटी ५० लाख रुपये भरून असे सदस्यत्व मिळवता येणार आहे.
अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या अनेकांचे धाबे दणाणले होते. या निर्णयानुसार अमेरिकेत नव्याने जन्माला येणाऱ्या परदेशी नागरिकांच्या मुलांना आता जन्मतः अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार नाही. या निर्णयाला एकीकडे न्यायालयात आव्हान दिलेले असताना आता ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या निर्णयाची घोषणा केली आहे. यामध्ये त्यांनी अमेरिकेचे व्हिसाचे नियम बदलले आहेत.
हा निर्णय नेमका काय..? या आधी अमेरिकेचे नागरिक होण्यासाठी कोणते व्हिसा धोरण होते? सध्याचा निर्णय आणि आताचा निर्णय यामध्ये काय फरक आहे? यामुळे भारतीयांना कसा फरक पडेल? जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या माध्यमातून..