
विनोद राऊत
rautvin@gmail.com
अमेरिकेच्या ४७व्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांना महिना लोटला आहे. त्यांच्या अध्यक्षीय वटहुकुमाची पहिली कुऱ्हाड अमेरिकन नोकरशाहीवर चालली. त्यामध्ये शिक्षण, संरक्षण इत्यादींसारख्या महत्त्वाच्या खात्यांत नोकरकपात करण्यासोबत अनेक महत्त्वाचे विभागच गुंडाळण्याचे काम सुरू आहे.
भारताप्रमाणे अमेरिकेत संघराज्यीय व्यवस्था आहे. परराष्ट्र व्यवहार, दळणवळण, संरक्षण, व्यापार इत्यादींसह काही महत्त्वाचे विषय केंद्राच्या तर उर्वरित विषय राज्यांच्या अख्यत्यारीत येतात. अमेरिकेच्या केंद्रीय प्रशासनात २२ लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात. त्यामध्ये जवळपास २० लाखांहून अधिक असलेल्या लष्कराचा समावेश नाही.