Premium| Umar Khalid: न्यायालयाने उमर खालिद व शरजील इमाम यांना जामीन का नाकारला?

UAPA Bail: UAPA कायद्यांतर्गत ‘प्रायमा फेसि’ निकष इतका कठोर का आहे? या निकषांमुळे न्यायालय जामीन का नाकारते जाणून घ्या...
Umar Khalid and Sharjeel Imam Were Denied Bail

Umar Khalid and Sharjeel Imam Were Denied Bail

esakal

Updated on

फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्लीच्या ईशान्य भागात ज्या दंगली उसळल्या त्या दंगली आजही देशाच्या इतिहासातील वाईट आठवणी म्हणून ओळखल्या जातात. या घटनेत ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, शेकडो नागरिक जखमी झाले. घरे, दुकाने मालमत्ता याचं जे नुकसान झालं त्याचा तर काही हिशोबच नाही. सर्वसामान्यांच्या जीवनात अचानक आलेल्या या संकटामुळे अनेकांचं जीवन उध्वस्त झालं..

याच पार्श्वभूमीवर दोन नावे सातत्याने राष्ट्रीय चर्चेत राहिली. उमर खालिद आणि शरजील इमाम. या गोष्टींमध्ये यांचा कितपत हात होता की यांना या गोष्टींमध्ये विनाकारण अडकवलं गेलं? या वर तेव्हा पासून आज पर्यंत अनेक वाद प्रतिवाद होत आले आहेत. न्यायालयाने त्यांच्या बरोबर असणाऱ्या इतर आरोपींना जामीन मंजूर केला आहे, मात्र नुकत्याच झालेल्या सुनवणीत यांना मात्र जामीन नाकारला आहे.

इतर आरोपींना जामीन मिळालेला असताना, हे दोघे मात्र वर्षानुवर्षे तुरुंगात का आहेत? त्यांच्यावर नेमके असे कोणते आरोप आहेत की सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना जामीन देण्यास नकार दिला? केवळ आंदोलनात सहभागी होणे गुन्हा ठरतो का, की त्यांच्या भूमिकेत काही वेगळे आणि गंभीर घटक होते? न्यायालय आरोप सिद्ध होण्याच्या अगोदर जामीन का नाकारते? या सगळ्या गोष्टी जाणून घेऊ सकाळ+च्या या लेखातून.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com