Premium|Digital overload analysis : इंटरनेटची जादूची कांडी आता छडी बनू पाहतेय? अथांग डेटाच्या जाळ्यात हरवणारे मानवी आयुष्य

Mental Health and Smartphone Overuse Solutions : अमर्याद माहिती आणि सोशल मीडियावरील रील्सच्या अविरत स्क्रोलिंगमुळे माणसाची डेटाची भूक वाढतच चालली असून, इंटरनेटच्या या अथांग जाळ्यात स्वतःवर नियंत्रण ठेवून योग्य वेळी थांबण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
Digital overload analysis

Digital overload analysis

esakal

Updated on

विठ्ठल काळे - mailvitthalkale@gmail.com

जगभरातील माहिती आपल्यासमोर असूनही आपल्याला अजून माहिती पाहिजे. आपला शोध थांबतच नाही. माहितीचा साठा अमर्याद आहे.

तो वाढतच राहणार आहे. मुद्दा हा आहे, की आपण या माहितीच्या जाळ्यातून आपल्याला पाहिजे ते नेमकं कसं मिळवायचं आणि जे आपल्याला नको आहे त्याकडे दुर्लक्ष कसं करायचं?

आता माणसाच्या हातात जादूची कांडी येऊन खूप वर्षं झाली. ती कांडी म्हणजे इंटरनेट. इंटरनेट आलं तेव्हा माणूस चकित झाला. आत्ता आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचे विविध कारनामे बघून होतो, अगदी तसं. एका सेकंदाचा अवधी, की लगेच मागणी पूर्ण होते. मग याला जादू नाही तर काय म्हणावे!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com