हर्ष काबरा
समुद्राखालील केबल या ९५ टक्के जागतिक डेटा आणि दररोजच्या अब्जावधींच्या आर्थिक देवाणघेवाणीच्या वाहक आहेत. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. या केबलचे संरक्षण हे गुप्तचर यंत्रणांसाठी एक महत्त्वाचे क्षेत्र बनले आहे.
बाल्टिक समुद्रातील तळाशी दडलेल्या दळणवळणाच्या दोन केबलचे नुकसान झाल्याचे नोव्हेंबर २०२४ मध्ये उघडकीस आले. एक केबल स्वीडनला लिथुआनियाशी जोडणारी होती आणि दुसरी फिनलंडला जर्मनीशी जोडणारी. चिनी जहाजाच्या नांगरीमुळे हे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेपूर्वी हे जहाज रशियामध्ये थांबले होते.