मुंबई: तब्बल बारा वर्षांनी त्या पदाच्या जागा निघाल्या होत्या. अनेक प्रयत्न करून मी त्यासाठीचा अर्ज भरला होता. पण नेमकी ती जागा वादात अडकली आणि ती परीक्षा पुढे ढकलली गेली. त्यानंतर साधारण दीड वर्षांनी मला मेसेज आला.परीक्षेसंदर्भातील काहीतरी मेसेज होता. मी त्यावेळी एका वेगळ्याच कामात असल्याने तो धड वाचलाच नाही. आणि परीक्षा होऊनही गेली.
मला स्वतःचाच खूप राग येत होता. अनेक वर्षांनी आलेली संधी मी सोडली होती. पुढचे अनेक दिवस मी स्वतःचाच राग राग करत होतो.. माझ्या हातून इतकी मोठी चूक कशी होऊ शकते..? मी आता काय करू..? मी जगायलाच लायक नाहीये का इथपर्यंत विचार माझ्या मनात येऊन गेला. प्रायव्हेट कंपनीत जॉब करणारा आणि त्यासोबतच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विनोद सांगत होता.
विनोदप्रमाणेच अनेकदा आपल्याही आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपल्याला आपल्याच वागण्याची प्रचंड लाज वाटते किंवा स्वतःलाच दोष द्यावासा वाटतो, स्वतःचाच खूप जास्त राग येतो. एखादी चूक आपल्या मित्राकडून किंवा जवळच्या व्यक्तीकडून झाली तर किती सहज समजून घेत त्याला किंवा तिला आधार देतो... पण मग जेव्हा त्याच गोष्टी स्वतःविषयी घडतात तेव्हा स्वतःला तसेच समजून घ्यायला मात्र आपण कमी पडतो.
स्वतःविषयी प्रेम, दया दाखवणं, स्वतःला समजून घेणं (self compassion) ही गोष्ट खूप कमी लोक करतात. तुमच्या स्वतःच्या चांगल्या जडणघडणीसाठी आणि एकुणातच चांगल्या आयुष्यासाठी स्वतःला समजून घेणं गरजेचं आहे असं संशोधन सांगतंय. पण इतकं सोपं असतं का हे..? अनेकदा हे वरवरचं सांत्वन किंवा स्वत:च्या चुकांवर पांघरून घालणं वाटू शकतं.. पण असं न वाटता प्रयत्नपूर्वक आणि प्रॅक्टिकली स्वतःला समजून घेणं म्हणजे काय? ती सवय कशी लावावी, स्वतःशी चांगलं वागणं का गरजेचं आहे? जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या विशेष लेखातून..!
(Explore how practicing self-compassion can help you overcome self-blame and embrace a healthier mindset after personal setbacks and mistakes.)