

विनायक इंगळे
vinayak.9984@gmail.com
गणित सोडवताना काल्पनिक एक्स गृहीत धरतो तसं हे मनही एक्स म्हणून असतं. खरंतर सर्व काही मेंदू नियंत्रित करतो. आपल्या शरीरात कोणताही मन नावाचा अवयव अजूनतरी सापडला नाहीय... पण हरकत नाही; आपल्याला मन आहे, असं गृहीत धरून विचार करूया... जसं शरीराच्या हालचाली मेंदूकडून नियंत्रित केल्या जातात, तसं भावना हे मनाचे खेळ आहेत, असं मानू या...
गेल्या आठवड्यात ऑफिसला जाताना एका ट्रॅफिक सिग्नलवर थांबलो होतो. माझ्या पुढे एक मोटारसायकल होती. त्यावर नंबर प्लेटच्या खाली इंग्रजीमध्ये एक इशारा लिहिला होता... ‘Caution - Rider is in bad mood.’ म्हणजे मोटारसायकलस्वार वाईट मूडमध्ये आहे. सदर मोटारसायकल परराज्यातील आणि अधिक इंजिन क्षमता असलेली होती.