
सुनील चावके
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने केंद्र सरकारचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यानिमित्ताने संसदेमध्ये सरकारच्या बहुमताची पुन्हा एकदा परीक्षा पाहायला मिळेल. धनकड ज्या मताधिक्याने निवडून आले होते, ते चित्र यावेळी दिसणार नाही. काही मित्र पक्षांची मतेही केंद्र सरकारला विचारात घ्यावी लागतील.
‘‘ईश्वरी हस्तक्षेप’ झाला नाही तर आपण ऑगस्ट-२०२७ पर्यंत उपराष्ट्रपतिपदावर राहू,’’ जगदीप धनकड यांनी चार आठवड्यांपूर्वी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना हे विधान केले होते.