Premium|UPI MDR Charges 2026 : यूपीआयच्या काही व्यवहारांवर एमडीआर शुल्क; ग्राहकांवर थेट बोजा पडणार का?

UPI Transaction Fees : १५ ऑक्टोबर २०२६ पासून यूपीआयच्या काही व्यवहारांवर एमडीआर शुल्क लागू होण्याच्या घोषणेमुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शुल्काचा संभाव्य परिणाम आणि यूपीआयच्या सोयी-सुरक्षिततेचे महत्त्व यांचा आढावा.
UPI MDR Charges 2026

UPI MDR Charges 2026

esakal

Updated on: 

पुरुषोत्तम बेडेकर - psbedekar२१@gmail.com

‘यु निफाइड पेमेंट इंटरफेस’ अर्थात ‘यूपीआय’च्या काही मर्यादेपलीकडील व्यवहारांवर ‘एमडीआर’ शुल्क लागू केल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांवर थेट बोजा पडणार नाही. व्यवहार शुल्कमुक्त असणे हे ‘यूपीआय’चे एकमेव बलस्थान नाही, तर सोय, वेग, तत्काळ पेमेंट, व्यवहारांची नोंद, सुरक्षितता आणि रोख रक्कम बाळगण्याची गरज नसणे, अशी अनेक बलस्थाने आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणे आजमितीला ग्राहक आणि व्यापारीवर्गालाही परवडणारे नाही. शेवटी ‘ग्राहक राजा असतो,’ याचा विसर उभयपक्षी पडू देता कामा नये, याची जाणीवही यानिमित्ताने पुन्हा एकदा सर्वांना होईल.

यंदाच्या १५ ऑक्टोबर २०२६ पासून ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ अर्थात ‘यूपीआय’च्या काही व्यवहारांवर ‘एमडीआर’ म्हणजेच ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ लागू होणार असल्याची घोषणा गेल्या महिन्यात करण्यात आली. या घोषणेने ग्राहक आणि व्यापाऱ्यांच्या मनात असंख्य प्रश्नांचे काहूर उठले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com