Premium|Digital Transformation of Cooperative Banks : नागरी सहकारी बँकांसाठी डिजिटल बँकिंगची नवी चौकट; आता तंत्रज्ञानाच्या शर्यतीत वेगाने प्रगती

Digital Banking Regulatory Framework : नागरी सहकारी बँकांचा संथ डिजिटल प्रवास आता वेग घेणार असून, सुरक्षित डिजिटल सेवा, तंत्रज्ञानाचा विस्तार आणि नियामक चौकटीमुळे सहकारी बँकिंग क्षेत्राला नव्या युगाची दिशा मिळणार आहे.
Digital Transformation of Cooperative Banks

Digital Transformation of Cooperative Banks

esakal

Updated on

दिलीप घाटे - dilipghate२@gmail.com

बदलत्या डिजिटल वातावरणात व्यावसायिक आणि खासगी बँका वेगाने पुढे गेल्या; मात्र नागरी सहकारी बँकांचा डिजिटल प्रवास तुलनेने संथ राहिला. ही दरी भरून काढण्यासाठी आणि सहकारी बँकिंग क्षेत्राला सुरक्षित डिजिटल दिशेने नेण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांसाठी स्वतंत्र डिजिटल बँकिंग नियामक चौकट लागू केली आहे.

त्यामुळे आता या बँकाही वेगवान प्रगती करू शकतील.

भारतीय बँकिंग क्षेत्राने गेल्या दशकात तंत्रज्ञानाच्या बळावर प्रचंड झेप घेतली आहे. शाखांमध्ये रांगा लावून व्यवहार करण्याची सवय आता हळूहळू इतिहासजमा होत असून, मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून काही क्षणांत व्यवहार पूर्ण होणे, ही आजची नवी वास्तविकता बनली आहे. एकात्मिक भरणा पद्धती (यूपीआय), तत्काळ पेमेंट सेवा (आयएमपीएस), राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतर (एनईएफटी), डिजिटल वॉलेट आणि मोबाईल बँकिंग यांसारख्या सेवांनी बँकिंग व्यवहार अधिक सोपे, वेगवान आणि सर्वसामान्यांसाठी सुलभ केले आहेत. या बदलत्या डिजिटल वातावरणात नागरी सहकारी बँकांचा डिजिटल प्रवास तुलनेने संथ राहिला. यामागे आर्थिक मर्यादा, तांत्रिक कौशल्याचा अभाव, नियामक स्पष्टतेची कमतरता आणि सायबर सुरक्षेबाबतची चिंता ही प्रमुख कारणे होती. ही दरी भरून काढण्यासाठी आणि सहकारी बँकिंग क्षेत्राला सुरक्षित डिजिटल दिशेने नेण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांसाठी स्वतंत्र डिजिटल बँकिंग नियामक चौकट लागू केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com