Premium|US China AI Race : AI नव्या शीतयुद्धाच्या दिशेने...

AI Safety Rules : एआयच्या वर्चस्वासाठी अमेरिका आणि चीनमध्ये स्पर्धा तीव्र झाली आहे. मात्र, वेगवान विकासासोबत सुरक्षेचे नियम, बाह्य देखरेख आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरजही अधोरेखित होत आहे.
US China AI Race

US China AI Race

esakal

Updated on

हर्ष काबरा

‘एआय’च्या वर्चस्वासाठी अमेरिका-चीनमध्ये बेभान शर्यत सुरू आहे. या वेगाच्या नादात सुरक्षेची वेसण सुटल्यास कृत्रिम बुद्धिमत्तेचे वरदान विनाशाचे कारण ठरू शकते. शी जिनपिंग यांच्या या आठवड्यातील अमेरिका दौऱ्यात ‘एआय’चा मुद्दा अग्रस्थानी राहण्याची शक्यता असून, या तंत्रज्ञानशर्यतीला सुरक्षिततेची चौकट घालण्याचे आव्हान दोन्ही महासत्तांसमोर आहे.

अवाढव्य पैसा, बेधडक नफा आणि फुगवलेल्या मूल्यांकनांनी पछाडलेले एआय व्यावसायिक जेव्हा अचानक मानवतेच्या भल्याचा आव आणतात, तेव्हा विस्मय आणि संशयाची अशी काही उकळी फुटते की ती पचवणे जड जाते! अँथ्रोपिकचे प्रमुख डॅरियो अमोडेई यांनी अलीकडेच ‘एआय’च्या बेधुंद वेगाला वेसण घालण्याचा प्रस्ताव मांडला. पुढील दशकात ‘एआय’ सर्व मानवांचा बळी घेऊ शकते, असे सांगत त्यांच्याच कंपनीच्या एका संशोधकाने राजीनामा दिल्यानंतर हा इशारा आला. अमोडेई यांनी अमेरिकेत ‘एआय’साठी समान सुरक्षा नियम, चीनसारख्या देशांशी सहकार्य आणि कंपन्यांवर बाह्य परीक्षकांची देखरेख या तीन गोष्टी सुचवल्या. अंदाधुंद स्पर्धेत सुरक्षेचा बळी जात असल्याच्या त्यांच्या या भूमिकेला ओपनएआयचे प्रमुख सॅम ऑल्टमन आणि ‘एक्सएआय’चे प्रमुख इलॉन मस्क या प्रतिस्पर्ध्यांनीही अनपेक्षितपणे तत्काळ दुजोरा दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com