Premium|US Midterm Elections 2026 : अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांचा भारतावर काय परिणाम होणार?

US Midterm Elections and India Relations : अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांचा परिणाम ट्रम्प यांच्या अधिकारांवर होणार आहे. भारत-अमेरिका व्यापार, आयात शुल्क, ऊर्जा सुरक्षा आणि भारतीय तरुणांच्या अमेरिकेतील संधींवरही या निकालाचा प्रभाव पडू शकतो.
US Midterm Elections 2026

US Midterm Elections 2026

esakal

Updated on: 

पूनम शर्मा - sakal.avtaran@gmail.com

अमेरिकेत ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांमधून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कारभार किती मोकळेपणाने करता येईल, हे ठरणार आहे. या निवडणुका केवळ ट्रम्प यांच्या सत्तेची कसोटी पाहणाऱ्या नाहीत; तर भारत-अमेरिका व्यापारसंबंध, आयात शुल्क, ऊर्जा सुरक्षा आणि भारतीय तरुणांच्या अमेरिकेतील संधींवरही त्यांचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. त्यामुळे तेथील सत्तासमीकरणाकडे भारताचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रातील एखादा निर्यातदार, पुण्यातील सॉफ्टवेअर अभियंता किंवा अमेरिकेच्या ग्रीन कार्डची प्रतीक्षा करणारे कुटुंब यांना अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका दूरच्या वाटू शकतात. मात्र, ३ नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानामुळे वॉशिंग्टनमधील राजकीय परिस्थिती बदलू शकते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतः या निवडणुकीत उमेदवार नाहीत. मात्र, या निवडणुकीच्या केंद्रस्थानी त्यांचीच सत्ता आणि अधिकार आहेत. अमेरिकी मतदार प्रतिनिधीगृहाच्या सर्व ४३५ जागांसाठी आणि सिनेटच्या सुमारे एकतृतीयांश जागांसाठी मतदान करतील. ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष काँग्रेसवरील आपले वर्चस्व टिकवतो की डेमोक्रॅटिक पक्षाला त्यांच्या धोरणांना अडथळे आणण्याची ताकद मिळते, हे या निकालातून स्पष्ट होईल.

Loading content, please wait...