
नवी दिल्ली:
अमेरिकेला जायची स्वप्न बघणाऱ्यांना येत्या वर्षापासून व्हिसासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. डोनाल्ड ट्रॅम्पने ४ जुलैला ‘द वन ब्यूटीफूल बिला'वर स्वाक्षरी केली. त्यात त्यांनी शिक्षण, पर्यटन, किंवा कामासंदर्भात अमेरिकेत येणाऱ्या भारतीयांसाठी २०२६ पासून नवीन ‘व्हिसा इंटेग्रीटी फी’ लागू केलेली आहे. हे शुल्क २५० डॉलर्स इतकं असेल. जे स्थलांतर करू पाहत नाहीयेत अशा लोकांसाठीच हे शुल्क आकारलं जाणार आहे.
जे शुल्क आधी १६,००० रुपयांच्या खाली होतं ते आता जवळपास अडीचपट होऊन ४०,००० रुपयांपर्यंत का गेलंय? US व्हिसा इंटेग्रीटी फी म्हणजे काय? हे नेमकं कुणासाठी आहे? आणि हे अमेरिकेने आताच का लागू केलंय? हे सगळं समजून घेऊयात ‘सकाळ प्लस’च्या या विशेष लेखातून...