
शरत् प्रधान
उत्तर प्रदेशात अजून दोन वर्षांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, जवळपास सर्वच राजकीय पक्ष आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. येथील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपची ओळख ही निवडणुकीसाठी कायम तयारीत असणारा पक्ष अशीच आहे.
दुसऱ्या बाजूला अन्य पक्षांनीदेखील भाजपच्या पावलावर पाऊल ठेऊन यावेळी तशाच पद्धतीने निवडणुकीची तयारी करायला सुरुवात केली आहे. या तयारीचे आणखी एक कारण म्हणजे, पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या पंचायत निवडणुका हेदेखील आहे. मात्र, त्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढल्या जात नाहीत, त्यामुळे सध्या सुरू असलेली तयारी ही २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच आहे.