Premium|Village Homes and Family Relationships : गावात घरं आहेत, माणसं कुठे आहेत?

Village Homes and Family Relationships: गावाकडची आकर्षक बंगली आणि बंद दरवाजे अनेक प्रश्न निर्माण करतात. कुटुंब, स्वतंत्र घर, नात्यांमधील बदल आणि स्वतःचं माणूसपण जपण्याची गरज या अनुभवातून अधोरेखित होते.
Village Homes and Family Relationships

Village Homes and Family Relationships

esakal

Updated on: 

सिद्धेश सावंत - sakal.avtaran@gmail.com

आपल्याला कुटुंब नको आहे, की कुटुंबाच्या नावाखाली आपल्यावर लादल्या जाणाऱ्या अटी? आपल्याला स्वतःचं घर हवं आहे, की स्वतःचं माणूसपण जपता येईल अशी जागा हवी? या सगळ्याची उत्तरं सेपरेट घर बांधलेल्यांनी आणि न बांधलेल्यांनी दोघांनीही शोधण्याची नितांत गरज गावी आल्यानंतर वाटू लागली.

गावी गेल्यानंतर फिरणं खूप होऊ लागलं. कामानिमित्तही आणि अवांतरही. फिरण्यातून आजूबाजूचा परिसर तर कळतोच; पण सोबत परिस्थितीचं भानही येत राहतं. त्यामुळे नुसतंच फिरणं होत नाही. त्यातून कळणंही होत जातं आपोआप.

माझं गाव वळीवंडे. मुंबई-गोवा हायवेवरून नांदगाव तिठ्यावरून उजव्या हाताला आत वळलं की देवगडचा रस्ता लागतो. नांदगावपासून वळीवंडे गाठताना असलदे, कोळोशी, हडपीड, शिरगाव आणि मग माझं गाव लागतं... संपूर्ण प्रवासात रस्ता वळणावळणाचा. चढ-उताराचा. आजूबाजूला एकापेक्षा एक भारी स्लॅबची घरं दिसतात. स्वप्नात एखादा बंगला बांधायचा झाला तर तो कसा असेल, याची प्रचीती देणारे बंगले दिसत राहतात.

कम्पाउंड, मध्यभागी गेट, घरासमोर पार्किंगला जागा, अंगणात तुळस, आजूबाजूला माडाची आणि आंब्याची झाडं, गेटशेजारी एखादा गुलमोहर, घराला वऱ्हांडा, गॅलरी, खाली हॉल, आत बेडरूम, किचन आणि वरतीही काढलेल्या काही खोल्या. वऱ्हांड्यात झोपाळा. रस्त्याशेजारी दिसत असलेलं घर... या वर्णनात थोडाफार बदल केला, तर रस्त्यावरून जाताना अशी साधारण घरं दिसत राहतातच. घरांचा आकार कमी-जास्त असतो. झाडांची संख्या जमिनीच्या आकारानुसार कमी-जास्त होते; पण चित्र सर्वसाधारणपणे एकच दिसतं. दिसायला ही घरं फार गोजिरवाणी वाटतात. आकर्षक दिसतात; पण निरखून पाहिल्यानंतर कळतं की या घरांच्या लाकडी दरवाजांच्या कड्या तर कुलूप लावून बंद केलेल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com