
किशोर पेटकर
अठरा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर विराट कोहलीचे आयपीएल करंडक जिंकण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. मैदानाचे चुंबन घेत त्याने भावनांना वाट मोकळी करून दिली आणि देशभरात आनंदाची ‘विराट’लाट उसळली.
क्रिकेटमधील महान, प्रथितयश, वलयांकित, यशस्वी अशा प्रदीर्घ कारकिर्दीत विराट कोहलीने सर्व मानसन्मान मिळविले. विश्वविजेतेपदाचा निर्धार केवळ एकदा नव्हे, तर तीन वेळा तडीस नेला.