Premium|Beyond Machiavelli Beryl Radin : 'हत्तीकडून माकडासारख्या नाचाची अपेक्षा करू नका'; प्रशासनाच्या मर्यादा ओळखून लोककल्याण कसे साधावे?

Public Policy and Administration : मॅकियावलीच्या सत्ताकेंद्रित विचारांना छेद देत डॉ. बेरील रॅडीन यांनी मांडलेला 'लोककेंद्रित' दृष्टिकोन आणि प्रशासकीय उतरंडीत काम करणाऱ्या 'माणसांचे' महत्त्व अधोरेखित करणारा एक प्रगल्भ वैचारिक प्रवास.
Beyond Machiavelli Beryl Radin

Beyond Machiavelli Beryl Radin

esakal

Updated on

विवेक पंडित

धोरणाची अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासनाची रचना गावपातळी ते मंत्रालयातील प्रधान सचिव अशा उतरंडीची अनेक स्तरीय असते. रचना अमूर्त असते, ती बदलत नाही; पण त्यात काम करणारे कर्मचारी-अधिकारी बदलत राहतात. रचनेला मूर्त स्वरूप आणण्याचं काम हे सारे करीत असतात... डॉ. बेरील रॅडीन यांनी मला नेमकं हेच शिकवलं, की व्यवस्था काम करत नाही; तर व्यवस्थेतील ‘माणसं’काम करतात...

‘A king should be cunning like a fox. It is safer to be feared than loved, if one can not be both.’

‘राजा कोल्ह्यासारखा धूर्त, कपटी असावा. प्रेम आणि भीती दोन्ही त्याला मिळू शकत नसतील तर राजाविषयी प्रेम वाटण्यापेक्षा त्याचं भय प्रजेमध्ये असावं, हे राजाकरिता अधिक सुरक्षित असतं.’

‘Ends justify means’

‘राजसत्ता टिकवणं हे साध्य साधण्यासाठी राजाला साधनशूचितेचं बंधन नाही.’

सक्ता: कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत।

कुर्याद्विद्वांस्तथाक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम्।।

ज्ञानी माणसाने आसक्ती न ठेवता लोककल्याणाकरिता (लोकसंग्रहाकरिता) काम केलं पाहिजे.

कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादय:।

लोकसंग्रहमेवापि संपश्यन्कर्तुमर्हसि।।

राजा जनकासारखं आसक्तीरहित कर्म करूनच परमसिद्धी प्राप्त होते. म्हणून समाजाचे कल्याण (लोकसंग्रह) लक्षात घेऊन तू (अर्जुना) कर्म करणेच उचित आहे.

निकोलो मॅकियावली यांच्या ‘द प्रिन्स’ (The Prince) या पुस्तकातील राजा, राजसत्ता यांवरील महत्त्वाचे सिद्धान्त; तसेच श्रीमद्‍भगवतगीतेच्या तिसऱ्या अध्यायातील विसावा, पंचविसावा जनकल्याणाविषयीचे श्लोक एखाद्या वृत्तवाहिनीवरील बातम्यांच्या धावत्या मथळ्यांसारखे भराभर माझ्या मेंदूच्या पटलावरून सरकत होते...

मी अमेरिकेतल्या वॉशिंग्टन डी.सी.मधील ‘ॲडव्होकसी इन्स्टिट्यूट’मध्ये प्रशिक्षण घेत होतो. ‘सार्वजनिक धोरण’ (Public Policy) या विषयातील जागतिक स्तरावरील तज्ज्ञ विचारवंत प्रा. डॉ. बेरील रॅडीन यांच्या ‘Beyond Machiavelli’ या पुस्तकातील लोकप्रशासन आणि सार्वजनिक धोरण यावरील त्यांच्या सिद्धान्तांविषयी त्या मला सांगत होत्या. त्या सार्वजनिक धोरणांबद्दल बोलत असताना माझ्या मेंदूत समांतर गीतेचे श्लोक वाजत होते; तर कधी मॅकियावलीच्या ‘द प्रिन्स’ या पुस्तकातील ओळी झरझर धावत होत्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com