

Shramjeevi Sanghatana Minimum Wage Struggle
esakal
जनआंदोलनं एखाद्या मुद्द्याची व्यापकता बंदिस्त करीत नाहीत, याउलट शक्यतांच्या परिसीमेपर्यंत विस्तारण्याची मुभा देतात. प्रश्न गुदमरवून संपवून टाकत नाहीत. प्रश्नाचं गांभीर्य अबाधित ठेवतात. प्रश्नांची उकल करण्यावर मर्यादा आणत नाहीत, म्हणून संघटित जनआंदोलनाशिवाय पर्याय नाही, हे सिद्धपीठाच्या लढ्यानं आम्हाला शिकवलं. संघटनेच्या स्वत:च्या बलस्थानांचा शोध घ्यायला शिकवलं.
सिद्धपीठानं कोणताच सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. शेवटी सत्याग्रह केला गेला, ज्यात ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर आणि सुप्रसिद्ध अभिनेते श्रीराम लागू हेदेखील सिद्धपीठाविरोधातल्या सत्याग्रहात सहभागी झाले, ज्यात लागू यांना अटकही झाली होती.