
हर्ष रंजन
वक्फ (सुधारणा) विधेयक, २०२५ यांविषयी बरेच गैरसमज आहेत. त्याचे मूळ स्वरूप नीट समजून घेतले तर अनेक प्रश्नांचे प्रभावीपणे निराकरण त्यातून होत असल्याचे स्पष्ट होते. हे विधेयक म्हणजे ‘वक्फ’ मंडळांची विश्वासार्हताही पुनर्स्थापित करण्याचा हा ठोस प्रयत्न आहे.
वक्फ मंडळांकडील मालमत्ता या खरे तर शिक्षण, आरोग्यसेवा, धार्मिक उद्दिष्ट या आणि अशा प्रकारच्या समाजाच्या कल्याणाशी जोडलेल्या गोष्टींसाठीच आहेत. मात्र अलिकडे या मंडळांच्या माध्यमातून जमिनी बळकावणे, खोटे दावे केले जाणे आणि राजकीय लागेबांधे असलेल्या मुस्लिम समाजातील व्यक्तींकडून या मालमत्तांचा गैरवापर केला जाण्यासारख्या घटना घडल्या आहेत. या मंडळांद्वारे गरीबांची सेवा केली जाण्याऐवजी, अनेकदा या मालमत्तांचा वैयक्तिक फायद्यांसाठी वापर केला जातो.