
कल्याणी शंकर
वक्फ सुधारणा विधेयक २०२५ अर्थात ‘उम्मीद’ या विधेयकानुसार या कायद्यात पारदर्शकता, जबाबदारी, आधुनिकता आणि कार्यक्षमता आदी बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. या विधेयकाद्वारे गैरमुस्लिमांना प्रतिनिधित्वाची तरतूद, प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि आर्थिक सुधारणांचा समावेश करण्यात आला आहे. या बदलाद्वारे अतिक्रमणांना रोखणे किंवा पायबंद घालणे तसेच या मालमत्तांचा वापर समाजाच्या कल्याणासाठी करणे अपेक्षित धरले आहे.