
धर्माच्या नावावर फार दिवस राज्य टिकत नाही. बांगलादेश भाषेमुळे आणि सत्तेत वाटा नसल्याने बाहेर पडला. आता बलुचिस्तान त्या वाटेवर आहे. धर्माची नशा फार काळ टिकत नाही हे पाकिस्तानला कधी कळणार काय माहीत?
आमचा गावाकडचा मित्र नेहमी एक गोष्ट सांगतो... तरुण पोरांचा ग्रुप असतो. कॉलनीत कुणाला काही अडचण आली, की ती पोरं हमखास धावून येणार. कुणाच्या घरी लग्न आसल, की काम करायला पोरं. अडचण आली, की मदत करायला पोरं. वर्गणी गोळा करणार, सण साजरे करणार... मदत वाटत फिरणार आन् त्या पोरांना सगळे कॉलनीवाले मनापासून मदत करणार. फक्त एक जण काही त्या पोरांना ताकास तूर लागू द्यायचा नाही. बरं, माणूस काही साधा नाही. शेठ माणूस. चंदू शेठ. त शेठचा स्वभावच आसा, की गप्पा मनसोक्त हाणणार; पण खिशातून एक छदाम नाही