
गौरव जोशी
एप्रिलच्या प्रारंभीपासून उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा कहर झाला आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने धरणांनी तळ गाठला आहे. गावोगावी पाण्याचे नैसर्गिक स्रोतही आटले आहेत. कोट्यवधीचा खर्च करुन शासनाने राबविलेल्या जलजीवन मिशनसारख्या योजना चुकीच्या पद्धतीने लादल्या गेल्याने त्या निष्क्रिय ठरत आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासमोर दुष्काळ ‘आ वासून’ उभा ठाकला आहे.