
भूषण महाजन
सगळे जर चांगलेच होणार असेल, तर बाजार एकदम वर का जाणार नाही? ह्याचे कारण म्हणजे आपले कंपनी कामकाज. २०२४-२५च्या चौथ्या तिमाहीचे निकाल बाजार बघेल. ते समाधानकारक नसल्यास २०२५-२६च्या पहिल्या तिमाहीपर्यंत बाजार टाइम करेक्शन करेल. उलटसुलट बातम्यांवर बाजार झोके घेत राहील. म्हणजे बाजार फारसा खाली येणार नाही,ृ पण थांबत थांबत वर जाईल.
ट्रम्प ह्यांनी निर्माण केलेले वादळ (तात्पुरते) तरी शमलेले दिसते. चीन वगळता इतर सर्व देशांना त्यांनी ९० दिवसांची मुदत दिली आहे. ट्रम्प उद्योजक असल्याने त्यांच्यात व्यापारी वृत्ती पूर्णपणे भिनलेली आहे. त्यांना कमी लेखून चालणार नाही; कुठल्या देशाबरोबर किती नमते घ्यायचे हे त्यांना पक्के कळते. सुदैवाने भारत त्यांच्या ‘गुड बुक्स’मध्ये आहे.