
ऋचा थत्ते
काळाबरोबर ती बदलली, तसे दागिनेही बदलले. जशी सणासुदीला ती मराठमोळा साजशृंगार करते, तशीच ब्लेझरवर बारीकशी चेन घालते. दांडिया खेळताना घागऱ्यावर हातभर बांगड्या घालते, तर ऑफिसला जाताना कुर्तीवर नाजूक ब्रेसलेट घालते. लग्नसोहळ्यात जरीकाठाच्या साड्यांवर पारंपरिक दागिने मिरवते, तर एखाद्या पार्टीला वेस्टर्न आऊटफीटसाठी छानसं पेंडंट निवडते. अनारकली ड्रेस, पैठणी, खणाची साडी, डिझायनर साडी, वनपीस, स्कर्ट, जीन्स असे नानाविध प्रकार तिच्या वॉर्डरोबमध्ये असल्यावर त्याला साजेसं ज्वेलरी कलेक्शन नसेल तरच नवल.