ब्रिजेश सिंह
Brijeshbsingh@gmail.com
भारतात सध्या एआयसाठी समर्पित कायदा नसला तरी, एआय नियमनाचा सक्रियपणे शोध घेतला जात आहे. ‘डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा, २०२३’ एआय प्रणालींद्वारे वापरकर्त्यांच्या डेटाचा गैरवापर रोखतो. ‘माहिती तंत्रज्ञान कायदा (२०००)’ सायबर सुरक्षेशी संबंधित एआय अनुप्रयोगांचे नियमन करतो. ‘कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी राष्ट्रीय धोरण २०१८’ आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या एआय मार्गदर्शक सूचना जबाबदार एआय विकासाला प्रोत्साहन देतात.
आजच्या युगातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीत कृत्रिम बुद्धिमत्ता एक क्रांतिकारी शक्ती म्हणून उदयास आली आहे. मात्र एआय तंत्रज्ञानाच्या विकासामुळे काही गंभीर आव्हानेही उभी राहिली आहेत. एआयचा विकास सुरक्षित व्हावा म्हणून त्या संबंधित कायदे आणि नियमही तयार होत आहेत. जगभरातील सरकारे त्यासाठी सक्रिय आहेत.