पुणे : २०१४ मध्ये मेटाने WhatsApp विकत घेतल्यानंतर एक प्रश्न सातत्याने विचारला जात होता की हे व्हॉटस अँप अजून कसं कमर्शिअल झालं नाही..? त्यांना कसं परवडतं..? त्यांच्या कमाईचं साधन काय..? पण आता व्हाट्स अँपने देखील आपले हात ओले करायला सुरुवात केली आहे. जगभरात तब्बल तीन अब्ज यूजर्स असलेल्या व्हाट्स अँपने जाहिराती सुरु केल्या आहे आहेत.
दिवसागणिक एकीकडे मेटा आपली पॉलिसी बदलत आहे. रोज नवे नियम, नव्या अटी आणि शर्ती येत आहेत. त्यामुळे अशा या बदलत्या वातावरणावर ज्या अँपवर आता माझे जवळपास शंभर टक्के अवलंबित्व आहे त्याच्या डेटाचे काय होणार..? या जाहिराती आता नेमक्या कुठे दिसणार..? माझ्या वैयक्तिक माहितीचं बाजारीकरण होणार का..? आत्ताच व्हाट्स अँपने हा निर्णय का घेतलाय? आणि सर्वात महत्वाचं या जाहिरातींमुळे आता माझा डेटा सुरक्षित राहणार की नाही..? त्याचं काय होणार? हे सगळं जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या या विशेष लेखातून..!