
Who is Marlene Engelhorn
मार्लेन एंजलहॉर्न ही तिशीतली ऑस्ट्रियन स्त्री राज्यव्यवहारात नागरिकांचा वाटा अधिक प्रभावी करण्याच्या प्रयत्नात लागलीय. लोकशाहीत लोकांचा सहभाग असला पाहिजे, हे तत्त्व ती प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करतेय. साधने (रिसोर्सेस) गोळा करणे आणि ती समाजात वाटणे ही जबाबदारी सरकारकडे असते. सरकार म्हणजे राज्यसत्ता-स्टेट. व्यक्ती आणि आर्थिक व्यवहारावर सरकार कर बसवते, तसेच करातून मिळालेले उत्पन्न सार्वजनिक कामांवर खर्च करते. हा व्यवहार सरकार नीट करत नाही, असे मार्लेनचं म्हणणं आहे. तो नीट व्हावा, यासाठी मार्लेन खटपट करत आहे.