
बंगळूर : कन्नड अभिनेत्री राण्या रावला १४.५६ कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणात अटक करण्यात आली. आयपीएस अधिकाऱ्याची कन्या, बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या अभिनेत्रीला अटक झाल्याने देशभरात या प्रकरणची चर्चा होणं साहजिकच. ती स्वतः निर्दोष असल्याचा दावा करत असली तरी तपास यंत्रणांनी तिच्या लक्झरी लाइफस्टाइल, संशयास्पद दुबई प्रवास आणि आर्थिक व्यवहारांबाबत अनेक धक्कादायक तथ्य समोर आणली आहेत. त्यामुळे ती कुठल्यातरी मोठ्या सोनेतस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा भाग आहे का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.