
डॉ. संतोष दास्ताने
एक स्थिर आणि सशक्त चलन म्हणून डॉलरचा दबदबा जगभर प्रस्थापित झाला आहे. परंतु जग आता वेगाने बदलत आहे. अनेक देश डॉलरला पर्याय शोधत आहेत. काही देशांनी त्यादिशेने पावले टाकली आहेत. भारताचाही त्यात समावेश आहे.
ज गभरातील आर्थिक-वित्तीय व्यवहार अमेरिकी डॉलरमार्फत करण्याला औपचारिक सुरुवात ब्रेटन वूड्स (अमेरिका) येथील जून १९४४ च्या परिषदेपासून झाली. त्यानंतर देशांचे आपापसांतील आयात-निर्यातीचे व्यवहार, कर्ज देणे-घेणे, गुंतवणुका करणे, राखीव चलन बाळगणे या सगळ्यांसाठी डॉलर चलनाचा माध्यम म्हणून वापर होत गेला.