
दर महिन्याप्रमाणे अदिती आणि आदित्यने भिंतीवर आपापली हाईट मार्क केली. दर महिन्यानुसार आदित्य एका इंचाने अदिती पेक्षा उंच झालेला असल्याने त्याला बाबांनी आणलेले चॉकलेट्स मिळणार होते. “तू ना माझ्या वाट्याचे चॉकलेट्स खातोस म्हणून उंच होतोस प्रत्येक वेळेला!” अदिती म्हणाली. आदित्य हसत हसत म्हणाला, “सगळे चॉकलेट्स घे बाई, पण उंच तर मीच होणारे. लिहून घे!”
हे भांडण अगदी लहानपणापासूनचं. भाऊ लहान असो किंवा मोठा, ऊंची मात्र कायम मोठीच!
पण असं का? पुरुष महिलांपेक्षा उंच का असतात? आपल्या शरीरांचं वेगळेपण ‘ऊंची’ सुद्धा ठरवत असेल का? आपले सेक्स क्रोमोझोम्स यात काही मदत करत असतील का? की अजून काही वेगळंच कारण असेल? चला समजून घेऊ ‘सकाळ प्लस’च्या या लेखातून...