Lack of confidence
Esakal
पुणे – “दीडशे ते दोनशे कॉन्सर्ट केल्यानंतरही प्रत्येक concert च्या आधी स्टेजवर जाण्यापूर्वीची पाच मिनिटं मला असं वाटतं की, मी फ्रॉड आहे, मी इथं काय करतोय? मला स्वत:बद्दलच असे प्रश्न पडतात” असं अत्यंत गुणी अभिनेता आणि दिग्दर्शक असणाऱ्या फरहान अफ्तर याने सांगितलं. राज शामानी यांच्या ‘Figuring Out’ या podcast मध्ये त्याने हे सांगितलं होतं.
फक्त फरहानच नाही तर मिशेल ओबामा, अभिनेत्री शेफाली शहा अशा अनेकांनी अगदी जाहीर कार्यक्रमात त्यांना असणाऱ्या सेल्फ डाऊटविषयी सांगतिलं आहे.
सामान्य माणसाबरोबरच अनेक मोठ्या व्यक्तींनाही सतत स्वत:बद्दल शंका असते. एखादा मोठा प्रोजेक्ट मिळाला तर एखाद्या वेळी स्वत:वर अशी शंका येणं कदाचित सहाजिक असेल पण जर प्रत्येकच गोष्टीत तुम्हाला स्वत:विषयी खात्री वाटत नसेल तर मात्र हे अतिविश्वासी स्वभावापेक्षाही घातक ठरू शकतं.
मी हे बरोबर करतोय ना? माझं काही चुकतंय का? मी माझं १०० टक्के देण्यात कमी पडतोय का? असे प्रश्नच याची लक्षणं असतात. प्रत्येक वेळी आपल्या निर्णयासाठी कोणाच्यातरी validation ची गरज आपल्याला पडते तेव्हा आपण Self Doubt मध्ये अडकलोय असं समजायला हरकत नाही.
पण या अशा सवयीमुळे कायमस्वरूपासाठी आपलं काय नुकसान होऊ शकतं, हे असं कशामुळे होतं, याची शास्त्रीय तसेच मानसशास्त्रीय कारणं काय, अभ्यास काय सांगतात आणि आपल्या बाबतीत जर असं होत असेल तर या सगळ्यातून व्यवस्थितरित्या बाहेर पडता येतं का या सगळ्याविषयी सकाळ+ च्या या विशेष लेखाच्या माध्यमातून आपण माहिती घेऊया.