पुणे : पदवी आहे पण नोकरी नाही. अशी गत आता भारतातील सर्वच क्षेत्रातील पदवीधरांची होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (ILO) च्या २०२४ च्या अहवालानुसार, भारतात उच्चशिक्षित तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण कमी शिकलेल्या किंवा निरक्षर लोकांपेक्षाही जास्त आहे. पदवीधरांसाठी बेरोजगारीचा दर हा २९.१ टक्के आहे, जो निरक्षर लोकांच्या तुलनेत ३.४ टक्क्याने जास्त आहे. त्यातच आता AI आल्याने आणखी काही व्हाईट कॉलर नोकऱ्या जाणार असल्याचे अभ्यास सांगत आहेत.
यावर अनेक संशोधकांच्या मते भारतात बाजारपेठेची गरज आणि पदवीधरांकडे असणारी कौशल्य यांच्यामध्ये प्रचंड दरी आहे आणि त्यामुळे एकीकडे चांगली माणसं मिळत नाही अशी ओरड ही कंपन्यांकडून होते तर बेरोजगारीचे आकडे भीषण स्थिती दर्शवतात.
याच पार्श्वभूमीवर सध्या भारतात 'फिनिशिंग स्कूल' उदयाला येत आहेत. पण या फिनिशिंग स्कूलची गरज का भासते आहे? फिनिशिंग स्कूल म्हणजे काय? ही स्कुल्स नेमकी काय काम करतात? बेरोजगारीचा आणि या फिनिशिंग स्कूलचा काय संबंध? हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया 'सकाळ प्लस' मधील या लेखाच्या माध्यमातून..!