Premium| अमेरिका का संतापली?

Why did Donald Trump impose high tariffs on imports: अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेचच देशाला पुन्हा एकदा ‘ग्रेट’ करण्यासाठी जी पावले उचलली, त्याची कारणे काय, याचाही विचार केला पाहिजे. अमेरिकेवर टीका करीत असतानाच आपण दुसरी बाजूसुद्धा लक्षात घेतली पाहिजे.
America foreign debt crisis and trade imbalance analysis

America foreign debt crisis and trade imbalance analysis

esakal

Updated on

डॉ. अनिल पडोशी, अर्थशास्त्राचे प्राध्यापक

America foreign debt crisis and trade imbalance analysis: अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जबर आयातकर बसविणे, परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेत येण्याचे नियम कडक करणे, अमेरिकेत येऊ इच्छिणाऱ्या परदेशी लोकांवर बंधन वाढविणे इत्यादी जालीम उपाययोजना त्यांनी सुरू केल्या. याबद्दल अमेरिका आणि ट्रम्प यांच्यावर टीकेचा भडिमार होत आहे. परंतु याच्या मुळाशी जायला हवे. अमेरिका हा आजमितीला वस्तू आणि सेवा यांची खरेदी करणारा जगातील सर्वांत मोठा ग्राहक आहे. ट्रम्प येण्यापूर्वी २०२३मध्ये अमेरिकेने एकूण साधारण चार लाख कोटी डॉलर इतकी रक्कम वस्तू व सेवा खरेदीसाठी खर्च केली. साहजिकच प्रत्येक देश आपल्या वस्तू अमेरिकेला विकण्यास उत्सुक असत. त्यामुळे अमेरिकेस परदेशी व्यापारात सातत्याने घाटा येऊ लागला. इतर देश (मुख्यत्वे चीन) आपल्या वस्तू अमेरिकेत विकतात, पण अमेरिकेकडून खरेदी मात्र फारशी करत नाहीत, हे ट्रम्प यांच्या लक्षात आले. अमेरिकेवर टीका करीत असताना दुसरी बाजूही लक्षात घेतली पाहिजे. अमेरिका इतरांसाठी काय करीत आहे किंवा केले आहे, याचा उहापोह करायला हवा. अमेरिकेने कोणासाठी काय केले हे पाहूया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com