
तारा भवाळकर
धोरण म्हणून त्रिभाषा सूत्राचे राज्य सरकारकडून समर्थन होत असल्यामुळे राज्यभर चर्चा होत आहे. तिसरी भाषा म्हणून हिंदीचा स्वीकार करण्याची राज्य सरकारची भूमिका होती. आता त्यावरून सरकारने माघार घेतली.
तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. पण यानिमित्ताने सुरू झालेली ही चर्चा पुढे नेली पाहिजे. ही चर्चा प्राथमिक स्तरावरील शिक्षण, सुविधा आणि मराठीचा महाराष्ट्राची राजभाषा म्हणून सर्व पातळ्यांवर स्वीकार कसा होईल इथपर्यंत जायला हवी, अशी अपेक्षा यावर्षीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष प्रा. तारा भवाळकर यांनी व्यक्त केली. त्यांनी मांडलेली भूमिका..