पुणे : आपल्या करियरमध्ये यशाचे टप्पे गाठण्यासाठी सर्वच क्षेत्रात आजवर पारंपरिक मार्ग वापरला जातो. म्हणजेच सुरुवातीला कनिष्ठ पदावर काम करणे मग हळूहळू प्रमोशन घेत वरच्या पदांवर जाणे... कॉर्पोरेट क्षेत्रातही आजवर याच पद्धतीने काम केले जाते आहे.
मात्र, सध्या मध्यम व्यवस्थापन म्हणजेच मिडल मॅनेजरिअल लेव्हलला काम करण्याची इच्छा कमी होत आहे असे एका अभ्यासातून समोर आले आहे. विशेषतः तरुण पिढीचे यामध्ये असे म्हणणे आहे की त्यांना हे काम अधिक तणावाचे, कमी प्रतिष्ठेचे आणि अधिक कटकटीचे वाटते.
पण 'मिडल मॅनेजरिअल लेव्हल' ची पोस्ट तरुण पिढीला का नकोशी वाटतेय..? याविषयी अभ्यासातून काय माहिती समोर आली आहे? हा 'जॉब रोल' नको आहे तर मग काय हवे आहे? आताची पिढी नेमका काय विचार करते आणि त्यामुळे 'जॉब ट्रेंड' कसे बदलत आहेत? हल्लीच्या काळात 'वर्क लाईफ बॅलन्स' ला का इतके महत्व आले आहे? जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या या लेखाच्या माध्यमातून..