
विमान वाहतूक, विमानतळ व्यवस्थापन, मालवाहतूक आदी उद्योगांत मागील ३० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या बंगळूरस्थित बोब्बा समूहाच्या संचालक चंद्रकला बोब्बा या उद्यमशील कुटुंबाच्या दुसऱ्या पिढीच्या प्रतिनिधी आहेत. विमान वाहतूक, विमानतळ कार्गो टर्मिनल हाताळणी, एअरपोर्ट ग्राउंड सर्व्हिसेस, विमान प्रवासी हाताळणी, गोदाम आणि लॉजिस्टिक्स अशा विविध व्यवसायांची धुरा त्या समर्थपणे हाताळत आहेत. ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार वसंत कुलकर्णी यांनी त्यांची घेतलेली ही विशेष मुलाखत...